29.4 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeDapoliदापोलीत दुचाकी स्वारांवर बिबट्याचा हल्ला, दोघे किरकोळ जखमी

दापोलीत दुचाकी स्वारांवर बिबट्याचा हल्ला, दोघे किरकोळ जखमी

या घटनेमुळे दापोलीत बिबट्याची दहशत पसरली असून आता बाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न दापोलीकरांना पडला आहे.

दापोली तालुक्यातील मौजे शिवाजीनगर साखरोळी ते दापोली रस्त्यावर साखरोळी शिवाजीनगर गावच्या हद्दीत दुचाकीवरून प्रवास करणारे वृषभ सुरेंद्र दाभोळकर रा. असोंड आणि अमर रविंद्र लांजेकर रा. शिवाजीनगर, साखरोळी या दोघांवर स्वातंत्र्यदिनी दुपारी २.३० ते २.४५ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात दुचाकीवर प्रवास करणारे दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेने दापोलीत खळबळ उडाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमींना दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेत ते दोघेही सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर आज दापोलीचे वनअधिकारी वैभव बोराटे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत ग्रामस्थांशी चर्चा केली आणि बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याचे त्यांचे म्हणणे एकून घेतले.

ज्या मार्गावर बिबट्याने हल्ला चढवला तो मार्ग हा महत्वाचा रहदारीचा जिल्हा ग्रामीण मार्ग आहे. याच रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार भर दुपारी घडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आज झालेल्या वनविभागाच्या बैठकीत या बिबट्याचा मार्ग बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्य स्थितीमध्ये कॅमेरा लावून बिबट्याची वहिवाट कशी आहे, हे पाहून पिंजरा बसवण्याची मागणी आज वनविभाचे समवेत झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थ डॉ. राजकुमार बर्वे यानी दिली. या घटनेमुळे दापोलीत बिबट्याची दहशत पसरली असून आता बाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न दापोलीकरांना पडला आहे. या हल्लेखोर बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. या आधीही अनेक ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular