25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeKhedकशेडी बोगद्यातून प्रवास लांबणीवरच...

कशेडी बोगद्यातून प्रवास लांबणीवरच…

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यापूर्वी एक लेन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याची डेडलाईन हुकणार आहे. कशेडी बोगद्याची गणेशोत्सवादरम्यान एक लेन खुली होईल, असे आश्वासन कोकण दौऱ्यावर आलेल्या राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. पण, करोडी बोगद्याकडे जाणारे रस्ते, छोटे पूल याचे काम अद्यापही सुरूच आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तीन- चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोकणातील पाऊस पाहता रस्त्याच्या दुतर्फा दरडीपासून होणारा धोका टाळण्यासाठी संरक्षक भिंती उभारण्याची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांनाचा कशेडी बोगद्यातून प्रवास कठीण आहे.

गणेशोत्सवानंतरच वाहतुकीची शक्यता – बोगदा आणि रस्ता यामधील दोन पुलांसाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुलाचे गर्डर या तंत्रज्ञाने बसवण्यात आले आहे. यापैकी एक पूल बेसिक तंत्रज्ञाभाने बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कशेडीमधील दोन्ही बोगदे अत्याधुनिक तंत्रज्ञाने तयार करण्यात येत आहेत. यासाठी बुमर मशीनच्या साह्याने बोगदा खोदण्यात आला आहे. बोगदा खोदण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे कोणती दुर्घटना न घडल्याने बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. एका बोगद्यात एकावेळी तीन वाहने तीन लेनमधून जाऊ शकणार आहेत. मात्र या कामात वायुविजन व्यवस्था अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे बोगद्याचे काम गणेशोत्सवानंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांचा काम पूर्णत्वाचा दावा फोल – पावसाळ्यात कशेडी घाट हा दरडीचा घाट म्हणून ओळखला जातो. या घाटात दरडी कोसळून मार्ग बंद होणे असे प्रकार सतत घडत असतात. त्याचबरोबर अपघातांमुळे हा घाट धोकादायक बनला आहे. त्यामुळे चौपदरीकरणात या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर येथून थेट बोगदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम २०१९ मध्ये सुरू झाले. अद्याप हे काम अपूर्ण आहे. बोगद्यांचे काम पूर्णत्सवास गेले असले तरी बोगद्याच्या आतील आणि बाहेरील रस्ते, संरक्षक भिंत, छोट पूल आदी कामे अपूर्ण आहेत. अधिकारी काम पूर्णत्वाचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात बोगद्यामधून वाहतूक कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular